यंदा सहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते दहावीची परीक्षा दिलेल्या मुला-मुलींना आमंत्रण देत आहोत — स्क्रीनपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात अनोख्या सृजनाचा अनुभव घेण्यासाठी - 'इब्लिस३.०'मध्ये!\n\nइब्लिस काय आहे?\n\nपालकांना सांगायचं तर दरवर्षी एक फाईन आर्ट आणि एक परफॉर्मिंग आर्टमधला विषय घेऊन होणारं इब्लिस हे एक निवासी शिबीर आहे. यात मुलं पाच दिवस शहराबाहेर एका ठिकाणी एकत्र राहतात. आपापल्या विषयात बुडून जातात आणि त्यातून बरंच काही शिकतात नि काहीतरी सृजनात्मक घडवतात. \n\nमुलांसाठी मात्र इब्लिस त्याहून बरंच काही आहे. अनेकजण आईबाबांपासून वेगळे, अनोळखी मुलांसोबत असे इतके दिवस पहिल्यांदा राहत असतात. त्यांच्यासाठी या कला समजून घेण्याबरोबरच स्वत:ला समजून घेण्याचा, स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रवास असतो. शिवाय यात मुलांच्या वयाला साजेसे अनेक खेळ, गप्पा, धमाल असतेच, शिवाय चांगलं जेवण, गप्पा मारायला, मनातलं बोलायला अनेक मित्र, ताई दादा असे सगळेच असतात. शिबीर कलात्मक असल्याने मुलांना पूर्व वेगळा अनुभव देणारं हे शिबीर असतं - त्यांना कायम स्मरणात राहील असं!\nयंदा काय ?\n\nयंदा विषय आहे निसर्ग शिल्प (अर्थात land-art) आणि संगीत. \n\nयात काय असेल? :\n🎨 लँड आर्ट — माती, दगड, पानं, सावल्या आणि प्रकाश यांचा वापर करून निसर्गाशी संवाद साधत काही आपलं म्हणणं एका मांडणीद्वारे सादर करायला शिकणं.\n🎶 संगीत — स्वर, ताल, शरीर-ध्वनी, निसर्गध्वनी यांचा शोध घेणं.\n🌿 भवती असलेल्या निसर्गाचं म्हणणं बारकाईने ऐकून, निरीक्षण करून त्यावर सर्जनशील प्रतिसाद देणं.\n🤝 गटामध्ये काम करणं, कल्पना उभारणं आणि सादरीकरण करणं\n\nही कार्यशाळा स्पर्धेसाठी नाही. इथे काहीच चूक नाही आणि कोणतंही आदर्श उत्तर नाही! इथे फक्त मुलं आहेत. स्वत:ला शहरी स्पर्धेतून बाहेर काढून, काही दिवस मोकळेपणाने स्वत:ला कलेतून शोधणारी\nही कार्यशाळा आहे — पाहण्यासाठी. ऐकण्यासाठी. घडण्यासाठी. जोडण्यासाठी.\nवयोगट : \n११ ते १६ (इयत्ता सहावीत जाणाऱ्या मुलांपासून ते दहावी पासआऊट होणाऱ्या मुलांपर्यंत सर्व)\nकोण घेणार: \nटायनी टेल्स, अटकमटक आणि अर्थियन आर्ट फाऊंडेशन मिळून ही कार्यशाळा घेते. \n\nएकूण ९ ते १० जणांची टीम मुलांसोबत तिथे पूर्णवेळ असेल. त्यापैकी काहींची नावे:\n\nप्रतीक जाधव : शिल्पकार, चित्रकार, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मूलांसोबत सातत्याने कार्यरत\nराहुल ननोरे : भित्तीचित्रकार, चित्रकार, डिझाईनर मूलांसोबत सातत्याने कार्यरत\nदीप डबरे : व्यावसायिक संगीत दिग्दर्शक, गायक, वादक\nकल्पेश समेळ : अभिनेता, दिग्दर्शक, स्टोरीटेलर. मुलांसोबत कामाचा १० वर्षांचा अनुभव.\nप्रतीक्षा खासनीस : अभिनेत्री, दिग्दर्शिका, स्टोरीटेलर, मुलांसोबत कामाचा १० वर्षांचा अनुभव. \nऋषिकेश दाभोळकर : संपादक, स्टोरीटेलर, मुलांसोबत कामाचा १८ वर्षांचा अनुभव.\n\nशुल्क : \n\nरुपये १३,०००/-\n\nया कार्यशाळेच्या शुल्कात, या कालावधीत मुलांची राहण्याची सामायिक सोय (Dormitory पद्धत), सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आणि चहा/फराळ याची सोय समाविष्ट आहे. तसेच या शुल्कात कार्यशाळेत लागणारे साहित्य, अवजारे यांचा खर्च समाविष्ट आहे.\nमुलांना कार्यस्थळी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पोचवायची आणि १ मे रोजी दुपारी घरी नेण्याची सोय पालकांनी करायची आहे.\nहे शुल्क मुलांचे आहे. पालक मुलांना घ्यायला येतील तेव्हा जेवणार असतील तर त्याचा दर वेगळा असेल.\nकशी नोंदणी करायची:\n\nहा फॉर्म व शुल्क भरून नोंदणी करता येईल. \n\nइतर सूचना\n\nसदर कार्यशाळा दिनांक २७एप्रिल ते १ मे २०२६ या काळात होईल.\nही कार्यशाळा अंजनवेल, शिळीम इथे असेल\nया कार्यशाळेच्या शुल्कात, या कालावधीत मुलांची राहण्याची सामायिक सोय (Dormitory पद्धत), सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आणि चहा/फराळ याची सोय समाविष्ट आहे.\nया शुल्कात कार्यशाळेत लागणारे साहित्य, अवजारे यांचा खर्च समाविष्ट आहे.\nमुलांना कार्यस्थळी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पोचवायची आणि १ मे रोजी दुपारी घरी नेण्याची सोय पालकांनी करायची आहे.\nया नियमात/तारखांत काही अपरिहार्य कारणाने(जसे की निवडणुका, मोर्चे, रोगाच्या साथी इत्यादी) बदल करावा लागला तर ते हक्क आम्ही राखून ठेवत आहोत.\nकाही कारणाने नोंदणी १५ मार्चपर्यंत रद्द केल्यास ७५% रक्कम परत मिळतील. १० एप्रिलपर्यंत रद्द केल्यास ५०% रक्कम परत मिळू शकेल. १० एप्रिलनंतर नोंदणी रद्द केल्यास कोणतीही रक्कम परत मिळणार नाही.\nकार्यशाळेच्या सर्व बाबतीत आयोजकांचे निर्णय अंतिम असतील.
Date: 13-14 Dec 2025
Location: Anjanvel, Shilim
Scan to register
Contact Us
📞 +91 9757310801 | +91 8928682330