About This Event
यंदा सहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते दहावीची परीक्षा दिलेल्या मुला-मुलींना आमंत्रण देत आहोत — स्क्रीनपासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात अनोख्या सृजनाचा अनुभव घेण्यासाठी - 'इब्लिस३.०'मध्ये!
इब्लिस काय आहे?
पालकांना सांगायचं तर दरवर्षी एक फाईन आर्ट आणि एक परफॉर्मिंग आर्टमधला विषय घेऊन होणारं इब्लिस हे एक निवासी शिबीर आहे. यात मुलं पाच दिवस शहराबाहेर एका ठिकाणी एकत्र राहतात. आपापल्या विषयात बुडून जातात आणि त्यातून बरंच काही शिकतात नि काहीतरी सृजनात्मक घडवतात.
मुलांसाठी मात्र इब्लिस त्याहून बरंच काही आहे. अनेकजण आईबाबांपासून वेगळे, अनोळखी मुलांसोबत असे इतके दिवस पहिल्यांदा राहत असतात. त्यांच्यासाठी या कला समजून घेण्याबरोबरच स्वत:ला समजून घेण्याचा, स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रवास असतो. शिवाय यात मुलांच्या वयाला साजेसे अनेक खेळ, गप्पा, धमाल असतेच, शिवाय चांगलं जेवण, गप्पा मारायला, मनातलं बोलायला अनेक मित्र, ताई दादा असे सगळेच असतात. शिबीर कलात्मक असल्याने मुलांना पूर्व वेगळा अनुभव देणारं हे शिबीर असतं - त्यांना कायम स्मरणात राहील असं!
यंदा काय ?
यंदा विषय आहे निसर्ग शिल्प (अर्थात land-art) आणि संगीत.
यात काय असेल? :
🎨 लँड आर्ट — माती, दगड, पानं, सावल्या आणि प्रकाश यांचा वापर करून निसर्गाशी संवाद साधत काही आपलं म्हणणं एका मांडणीद्वारे सादर करायला शिकणं.
🎶 संगीत — स्वर, ताल, शरीर-ध्वनी, निसर्गध्वनी यांचा शोध घेणं.
🌿 भवती असलेल्या निसर्गाचं म्हणणं बारकाईने ऐकून, निरीक्षण करून त्यावर सर्जनशील प्रतिसाद देणं.
🤝 गटामध्ये काम करणं, कल्पना उभारणं आणि सादरीकरण करणं
ही कार्यशाळा स्पर्धेसाठी नाही. इथे काहीच चूक नाही आणि कोणतंही आदर्श उत्तर नाही! इथे फक्त मुलं आहेत. स्वत:ला शहरी स्पर्धेतून बाहेर काढून, काही दिवस मोकळेपणाने स्वत:ला कलेतून शोधणारी
ही कार्यशाळा आहे — पाहण्यासाठी. ऐकण्यासाठी. घडण्यासाठी. जोडण्यासाठी.
वयोगट :
११ ते १६ (इयत्ता सहावीत जाणाऱ्या मुलांपासून ते दहावी पासआऊट होणाऱ्या मुलांपर्यंत सर्व)
कोण घेणार:
टायनी टेल्स, अटकमटक आणि अर्थियन आर्ट फाऊंडेशन मिळून ही कार्यशाळा घेते.
एकूण ९ ते १० जणांची टीम मुलांसोबत तिथे पूर्णवेळ असेल. त्यापैकी काहींची नावे:
प्रतीक जाधव : शिल्पकार, चित्रकार, जे जे स्कूल ऑफ आर्ट, मूलांसोबत सातत्याने कार्यरत
राहुल ननोरे : भित्तीचित्रकार, चित्रकार, डिझाईनर मूलांसोबत सातत्याने कार्यरत
दीप डबरे : व्यावसायिक संगीत दिग्दर्शक, गायक, वादक
कल्पेश समेळ : अभिनेता, दिग्दर्शक, स्टोरीटेलर. मुलांसोबत कामाचा १० वर्षांचा अनुभव.
प्रतीक्षा खासनीस : अभिनेत्री, दिग्दर्शिका, स्टोरीटेलर, मुलांसोबत कामाचा १० वर्षांचा अनुभव.
ऋषिकेश दाभोळकर : संपादक, स्टोरीटेलर, मुलांसोबत कामाचा १८ वर्षांचा अनुभव.
शुल्क :
रुपये १३,०००/-
या कार्यशाळेच्या शुल्कात, या कालावधीत मुलांची राहण्याची सामायिक सोय (Dormitory पद्धत), सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आणि चहा/फराळ याची सोय समाविष्ट आहे. तसेच या शुल्कात कार्यशाळेत लागणारे साहित्य, अवजारे यांचा खर्च समाविष्ट आहे.
मुलांना कार्यस्थळी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पोचवायची आणि १ मे रोजी दुपारी घरी नेण्याची सोय पालकांनी करायची आहे.
हे शुल्क मुलांचे आहे. पालक मुलांना घ्यायला येतील तेव्हा जेवणार असतील तर त्याचा दर वेगळा असेल.
कशी नोंदणी करायची:
हा फॉर्म व शुल्क भरून नोंदणी करता येईल.
इतर सूचना
सदर कार्यशाळा दिनांक २७एप्रिल ते १ मे २०२६ या काळात होईल.
ही कार्यशाळा अंजनवेल, शिळीम इथे असेल
या कार्यशाळेच्या शुल्कात, या कालावधीत मुलांची राहण्याची सामायिक सोय (Dormitory पद्धत), सकाळचा नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आणि चहा/फराळ याची सोय समाविष्ट आहे.
या शुल्कात कार्यशाळेत लागणारे साहित्य, अवजारे यांचा खर्च समाविष्ट आहे.
मुलांना कार्यस्थळी २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पोचवायची आणि १ मे रोजी दुपारी घरी नेण्याची सोय पालकांनी करायची आहे.
या नियमात/तारखांत काही अपरिहार्य कारणाने(जसे की निवडणुका, मोर्चे, रोगाच्या साथी इत्यादी) बदल करावा लागला तर ते हक्क आम्ही राखून ठेवत आहोत.
काही कारणाने नोंदणी १५ मार्चपर्यंत रद्द केल्यास ७५% रक्कम परत मिळतील. १० एप्रिलपर्यंत रद्द केल्यास ५०% रक्कम परत मिळू शकेल. १० एप्रिलनंतर नोंदणी रद्द केल्यास कोणतीही रक्कम परत मिळणार नाही.
कार्यशाळेच्या सर्व बाबतीत आयोजकांचे निर्णय अंतिम असतील.
Event Details
Date
Monday, April 27, 2026 to Friday, May 01, 2026